बृहन्मुंबई महानगरपालिका जी/उत्तर महानगरपालिका प्रयोगशाळा

सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते संध्याकाळी 4:30 पर्यंत नमुने स्वीकारले जातील(सरकारी सुट्ट्या वगळता)

प्रशासन शाखा

  • होम
  • /
  • बद्दल
  • /
  • प्रशासन शाखा
अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) : श्रीमती. प्राजक्ता वर्मा लवंगारे
उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) : श्री. शरद उघडे
कार्यकारी आरोग्य अधिकारी : डॉ. दक्षा शाह
संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी : डॉ. संतोष गायकवाड
महापालिका विश्लेषक : डॉ. संतोष जठार

महापालिकेची प्रयोगशाळा ही बृहमुंबई नगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारीत कार्यरत आहे . अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) व उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेचे दैनंदिन कामकाज चालू आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी (ई. एच. ओ.) हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख असतात, प्रयोगशाळेच्या व्यवस्थापनाचे प्रमुख देखील असतात, धोरणे आणि नियमांच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. सहकार्यकारी आरोग्य अधिकारी (दि. ई. एच. ओ.) प्रयोगशाळेच्या एकूण कामकाजावर देखरेख ठेवतात तसेच अन्न आणि पाण्याच्या नमुन्यांच्या दर्जेदार चाचणीसाठी आवश्यक चाचणी संसाधने, उपकरणे, कर्मचाऱ्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे कामदेखील करतात.

सार्वजनिक आरोग्य विभागाने सामुदायिक सेवांसाठी प्रयोगशाळा स्थापन केली आणि त्याच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत आणि दर्जेदार चाचणी सेवा पुरवण्यासाठी नवीनतम तांत्रिक साधने आणि उपकरणे पुरवली आहेत. सतत मार्गदर्शन, प्रेरणा आणि पाठबळ दिल्याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (पी. एच. डी.) अधिकाऱ्यांचे महापालिका विश्लेषक प्रयोगशाळा आभारी आहे.

जलद माहिती